Khadakwasla Dam : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या धरणाचा पाणी साठा जुलैमध्येच यशाच्या उच्च पातळीवर, पहा सविस्तर…..
Khadakwasla Dam : मे महिन्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला त्या पावसामुळे आणि पुढे मान्सूनने लवकर हजेरी लावल्यामुळे चालू वर्षी पावसाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा जुलैमध्ये पोहोचला विक्रमी पातळीवर. मागील वर्षी पेक्षा चालू वर्षी धरणाचा पाणी साठा जास्त झालेला आहे.
Khadakwasla Dam :
मे महिन्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला त्या पावसामुळे आणि पुढे मान्सूनने लवकर हजेरी लावल्यामुळे चालू वर्षी पावसाचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा जुलैमध्ये पोहोचला विक्रमी पातळीवर. मागील वर्षी पेक्षा चालू वर्षी धरणाचा पाणी साठा जास्त झालेला आहे.
जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला व अनेक धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर दिसून आल्यामुळे अनेक धरणातील पाणी पातळी कमालीची वाढली व त्यामुळे नक्कीच शेती क्षेत्रासाठी ही परिस्थिती एक समाधानकारक आहे. सध्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र असून त्याप्रमाणे खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात देखील सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे साहजिकच या धरणातून जो काही पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता तो आता थांबवण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. या अनुषंगाने या धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत किती टक्के पाणी जमा झाले आहे? याची माहिती थोडक्यात या लेखात बघू.

खडकवासला प्रकल्पाच्या धरणांमध्ये किती आहे पाणीसाठा?
आतापर्यंत खडकवासला धरणातून पाच टीएमसी पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेले आहे व खडकवासला प्रकल्पातील जी चार धरणे आहेत त्यामध्ये आतापर्यंत 71 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे व टीएमसीमध्ये पाहिले तर हे पाणी 21 टीएमसी इतके आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 27% इतका होता. म्हणजेच ही चारही धरणे मिळून आतापर्यंत 20.87 टीएमसी अर्थात एकत्रितपणे 59% पाणीसाठा जमा झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्रमी पाणी जमा झाल्याचे सध्या चित्र आहे.
मे महिन्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला त्या पावसामुळे आणि पुढे मान्सूनने लवकर हजेरी लावल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली व अडीच महिन्यात पावसाचा जोर असाच राहिला तर या धरणांमधून विसर्गाच्या माध्यमातून आणखी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. परंतु सध्या तरी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
खडकवासला प्रकल्पातील धरणातील सध्याचा पाणीसाठा
खडकवासला प्रकल्पातील धरणातील पाणीसाठा बघितला तर खडकवासला धरण सध्या 58.16 टक्के भरले असून पानशेत 70.75%, वरसगाव 75.99% व टेमघर 65.97% भरले आहे. असे चारही धरण मिळून एकूण पाणीसाठा 71.59% इतका आहे.
