MANOJ JARANGE PATIL: “जरांगे म्हणजे पवारांचा सुसाईड बॉम्ब? भाजप आमदाराचा धक्कादायक दावा… राजकारणात नवे वळण
"मराठा आरक्षणाच्या रणांगणात आरोप-प्रत्यारोपांची धग; जरांगे पाटलांवर ‘सुसाईड बॉम्ब’चा ठपका, पवारांवर अराजकतेचे आरोप… सत्ताधाऱ्यांच्या टोकदार विधानांनी आंदोलनाचा ज्वालामुखी आणखी भडकणार?"
MANOJ JARANGE PATIL: मुंबई सध्या अक्षरशः मराठा आरक्षणाच्या रणांगणात परिवर्तित झाली आहे. आझाद मैदानात हजारो आंदोलकांनी ठाण मांडले असून, मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. कालच्या सरकारी हालचालींपासून ते आसमानी संकटांपर्यंत सगळ्याचा सामना करत आंदोलक आजही मैदानात डटून बसलेले दिसतात. जरांगे (MANOJ JARANGE PATIL) यांची ठाम मागणी एकच मराठ्यांना थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी याच मैदानावर उपोषणाचा नारा दिला होता आणि आता पुन्हा एकदा तो संघर्ष पेटला आहे. आझाद मैदानापुरतेच नव्हे, तर मुंबईची वेशी व वाशीपर्यंत मराठा समाज रस्त्यावर उतरल्याने वातावरण तापले आहे.
मात्र या संघर्षमय पार्श्वभूमीवर राजकारणाने आणखी गडद रंग घेतला आहे. भाजपकडून थेट आरोप करण्यात आले की, या आंदोलनामागे विरोधकांची फूस आहे. यावर लोकमत विभागले गेले असले तरी, एका आमदाराच्या वादग्रस्त विधानाने खळबळ उडवली आहे. भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात धुरळा उडवला आहे. त्यांनी थेट आरोप केला की, “मनोज जरांगे (MANOJ JARANGE PATIL) हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सुसाईड बॉम्ब आहेत.” इतकेच नव्हे, तर जरांगे यांच्या रुपाने शरद पवार यांनी हा ‘सुसाईड बॉम्ब’ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकण्यासाठी तयार केला असल्याचा घणाघाती दावा त्यांनी केला.

या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा पेटली असून, विरोधकांकडून केणेकरांवर टीकेची झोड उठली आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात जरांगे पाटील मात्र अद्याप मौन बाळगून आहेत. त्यामुळे पुढे ते काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे डोळे लागले आहेत.
पवारांनी राज्यात दंगली घडवल्या:
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वादाचे वारे अधिकच जोर धरताना दिसत आहेत. भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी एक भलताच स्फोटक आरोप करत खळबळ उडवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “जरांगे यांच्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे. शरद पवार हे जरांगे (MANOJ JARANGE PATIL) सारखे सुसाईड बॉम्ब तयार करतात आणि त्याचा वापर करतात, हे राज्याचं दुर्दैव आहे.” एवढ्यावरच न थांबता केणेकरांनी असा दावा केला की, याचा परिणाम थेट राज्याच्या भवितव्यावर होणार आहे.

त्यांनी शरद पवारांच्या कारकीर्दीवर निशाणा साधत आरोप केला की, “पवारांनी कधीच कुणालाही मुख्यमंत्री पदावर कायमचं बसू दिलेलं नाही. (MANOJ JARANGE PATIL) महाराष्ट्र अराजकतेकडे नेणं, जाती-जातीत भांडणं लावणं, दंगली घडवणं हीच त्यांची राजकीय परंपरा राहिली आहे.” वसंतदादा पासून ते वसंतराव नाईक यांच्या काळापर्यंत अशी अराजकता घडवण्याचं काम पवारांनी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे आधीच पेटलेलं आंदोलन अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत असून, विरोधकांकडून केणेकरांवर टीकेची झोड नक्कीच उठणार, यात शंका नाही.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पेटलेलं आंदोलन आता नव्या वादळाला आमंत्रण देत आहे. भाजपमधूनच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार संजय केणेकर यांनी तर थेट आरोप केला की, “फडणवीसांविषयी व्यक्तिगत आकस आणि जातीय द्वेष यामुळेच जरांगे (MANOJ JARANGE PATIL) यांच्यामार्फत गावागाड्यातील मराठ्यांना विरोधात उभं केलं जात आहे.” एवढंच नव्हे, तर त्यांनी जरांगे यांना थेट शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब ठरवलं आहे.

या विधानामुळे आधीच तापलेल्या वातावरणात आणखी तणाव निर्माण झाला आहे. आतापर्यंतची चर्चा ओबीसी आरक्षणात मराठ्यांना वाटा द्यायचा का, की त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं या मुद्द्यावर केंद्रित होती. पण आता आंदोलनाचा सूर थेट राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या टोकाला पोहोचला आहे. सत्ताधाऱ्यांच्या गोटातूनच “जरांगे हे सुसाईड बॉम्ब” (MANOJ JARANGE PATIL) अशी टोकाची भूमिका घेतली जाऊ लागल्याने संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
