Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

rain update : हिमाचलमध्ये पावसाचा धुमाकूळ, गेले तब्बल एवढे बळी. पहा सविस्तर…..

rain update : हिमाचलमध्ये पावसाचा धुमाकूळ, गेले तब्बल एवढे बळी. हिमाचल मध्ये गेल्या २८ दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असून या मध्ये तब्बल पावसामुळे १०९ जणांचा बळी देखील गेला आहे.

rain update : 

हिमाचलमध्ये पावसाचा धुमाकूळ, गेले तब्बल एवढे बळी. हिमाचल मध्ये गेल्या २८ दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असून या मध्ये तब्बल पावसामुळे १०९ जणांचा बळी देखील गेला आहे.

हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून पावसाशी संबंधित घटना आणि रस्ते अपघातांमध्ये मागील २८ दिवसांत १०९ जणांचा बळी गेला आहे. यांपैकी ६४ जणांचा मृत्यू हा पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला. तर ४५ जण रस्ते अपघातात दगावले. याशिवाय अतिवृष्टी आणि ढगफुटीसारख्या घटनांमुळे ८८३ कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे.

rain update
rain update

हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने २० जून ते १६ जुलैदरम्यान राज्यातील बळींची आकडेवारी गुरुवारी जारी केली. त्यानुसार या २८ दिवसांच्या कालावधीत अतिवृष्टी, भूस्खलन, पूर, ढगफुटी, वीज पडणे, सर्पदंश आणि उंचीवरून पडण्यासारख्या घटनांमध्ये ६४ जण दगावले आहेत. मंडी आणि कांगरा जिल्हयात अशा घटना जास्त घडल्या. शिवाय अतिवृष्टी व ढगफुटीसारख्या घटनांमुळे पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले. ४६ हजारांहून अधिक रस्ते, विद्युत यंत्रणा, जल व्यवस्थापन आणि सार्वजनिक इमारतींना मोठा फटका बसला.

जवळपास ८८३ कोटी रुपयांच्या सरकारी व खासगी संपत्तीचे नुकसान झाले आहे. या काळात १,२२८ पशू आणि २१,५०० हून अधिक कोंबड्या मरण पावल्याचे प्राधिकरणने म्हटले आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस
सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून व्यापक पातळीवर उपाय योजना केल्या जात आहेत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक लवकरच हिमाचलमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पावसामुळे आतापर्यंत जवळपास १,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी शाह यांना दिली.

Leave a comment