Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

Ahilyanagar Bribery Case : 1.47 कोटींची नुकसानभरपाई अडवून 1.20 लाखांची लाच ? महसूल विभागातील दोन जणांवर गुन्हा.

1.20 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप. एसीबीच्या पडताळणीनंतर महसूल विभागातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Ahilyanagar news 

अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणात राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करून देण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी महसूल सहाय्यक आणि एका कंत्राटी कर्मचार्‍याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या जंगलेवाडी येथील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले होते. त्याबदल्यात सुमारे 1 कोटी 47 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली होती. मात्र प्रलंबित निधी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या एफटीओ मंजुरीसाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाच मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठीही लाच मागितली जात असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Leave a comment