Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

Instagram Latest News : इंस्टाग्राम आणि फेसबुक अचानक ठप्प; हजारो युजर्सना लॉगिन आणि फीड रिफ्रेशचा त्रास

Instagram Down Today | Instagram Login Problem

इंस्टाग्राम बंद पडलंय का ? भारतासह अनेक देशांमध्ये Meta च्या सेवा ठप्प

मुंबई : शुक्रवारी संध्याकाळी अचानक इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरणाऱ्या हजारो युजर्सना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे “Instagram Down”, “Instagram Down in India” आणि “Facebook Down” असे शब्द सोशल मीडियावर आणि गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केले जाऊ लागले.

अनेक युजर्सनी सांगितले की, इंस्टाग्रामचे फीड रिफ्रेश होत नव्हते, स्टोरी अपलोड होत नव्हत्या आणि डायरेक्ट मेसेज (DM) देखील उघडत नव्हते. काही जणांचे अकाउंट अचानक लॉगआऊट झाले, तर पुन्हा लॉगिन करण्याचाही प्रयत्न अयशस्वी ठरत होता.

इंस्टाग्राम वापरकर्त्यांची मोठी गैरसोय

इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना अचानक फीड थांबणे, “Couldn’t refresh feed” असा मेसेज येणे, स्टोरी अपलोड न होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या. अनेकांनी मेसेज पाठवले तरी ते ‘Sending’ वरच अडकून राहत असल्याचे सांगितले.

फेसबुकवरही परिणाम

ही समस्या फक्त इंस्टाग्रामपुरती मर्यादित राहिली नाही. फेसबुक वापरकर्त्यांनाही लॉगिन करता येत नसल्याच्या तक्रारी आल्या. काहींना सर्व्हर एरर दिसत होती, तर काहींचे अकाउंट उघडतच नव्हते.

“इंस्टाग्राम बंद पडलंय का ?” गुगलवर सर्चचा पाऊस

अचानक आलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे अनेकांनी एक्स (ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. “तुमचंही इंस्टाग्राम बंद आहे का?” अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या. भारतासह अनेक देशांतील युजर्सना हा फटका बसल्याचं दिसून आलं.

Meta कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही

इंस्टाग्राम आणि फेसबुकची मालकी असलेल्या Meta कंपनीने या समस्येबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, अशा प्रकारचे सर्व्हर किंवा नेटवर्कमधील तांत्रिक बिघाड काही वेळात दुरुस्त केले जातात, असा यापूर्वीचा अनुभव आहे.

दरम्यान, जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक लॉगआऊट झालं असेल किंवा फीड रिफ्रेश होत नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही. ही समस्या केवळ तुमच्यापुरती नसून जगभरातील अनेक वापरकर्त्यांना याचा सामना करावा लागत आहे.

ही घडामोड अद्याप सुरू असून, Meta कडून अधिकृत माहिती आल्यानंतर पुढील अपडेट दिले जातील.

Leave a comment