Ahilyanagar Bribery Case : 1.47 कोटींची नुकसानभरपाई अडवून 1.20 लाखांची लाच ? महसूल विभागातील दोन जणांवर गुन्हा.
1.20 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप. एसीबीच्या पडताळणीनंतर महसूल विभागातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
Ahilyanagar news
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणात राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करून देण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी महसूल सहाय्यक आणि एका कंत्राटी कर्मचार्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
