शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभागाबाबत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. संबंधित पोस्टमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत प्रसादालय आणि लाडू निर्मिती केंद्र सील केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा असल्याचे श्री साईबाबा संस्थानने स्पष्ट केले आहे.
संस्थानच्या म्हणण्यानुसार, साई प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभाग नियमितपणे कार्यरत असून अन्न सुरक्षा आणि आरोग्य विषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाते. दररोज हजारो साई भक्तांना मोफत प्रसाद भोजन दिले जाते. तसेच प्रसाद निर्मिती प्रक्रियेत गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा चाचण्या आणि शासकीय नियमांचे पालन केले जाते.
सोशल मीडियावरील या कथित खोट्या पोस्टमुळे साई भक्तांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची तसेच संस्थानच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित सोशल मीडिया अकाउंट चालविणाऱ्या व्यक्तीविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात संस्थानने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. संस्थानशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती केवळ संस्थानच्या अधिकृत माध्यमांद्वारेच ग्राह्य धरावी.
अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | सविस्तर लेख | आम्ही स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, समाज, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण, विशेष रिपोर्ट्स आणि लाईव्ह अपडेट्स आपल्या पर्यंत मराठीतून पोहोचवतो. सर्व काही एक क्लिकवर
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #ahilyanagartimes24
आमच्याशी संपर्क कसा कराल ?
Contact Emails below!
For Business Enquiries: contact@ahilyanagartimes24
For Internships and Jobs: ahilyanagartimes24@gmail.com
Other General Enquiries/Collaborations: ahilyanagartimes24@gmail.com