AHILYANAGAR NEWS : विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले सरपंच; शाळेत शिक्षकांची कमी पहा सविस्तर…..
AHILYANAGAR NEWS : विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले सरपंच नेवासातील पाचेगाव येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे सरपंच हाती खडू फळा घेऊन गेले विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाहूया सविस्तर.....
AHILYANAGAR NEWS :
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले सरपंच नेवासातील पाचेगाव येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे सरपंच हाती खडू फळा घेऊन गेले विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाहूया सविस्तर.
पाचेगाव : राज्यातील अनेक सरकारी व खासगी शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी मानधन तत्त्वावर शिक्षक काम करतात; परंतु हे शिक्षकही शाळेला कमी पडत आहे. अशीच परिस्थिती राज्यासह पाचेगाव (ता. नेवासा) येथील माध्यमिक विद्यालयातही पाहायला मिळते.

राज्य सरकारकडून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात असली, तरी ती अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. माध्यमिक विद्यालयातील रिक्त जागा केव्हा भरल्या जातील, याचा काही नेम नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गावचे उच्चशिक्षित सरपंच वामन तुवर यांनी स्वतः पुढाकार घेत हाती खड्डू फळा घेतला.
पाचेगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना सरपंच वामन तुवर. पाचेगाव येथील माध्यमिक विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. येथे प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकड्याही आहेत.

या विद्यालयात पाचेगावसह आसपासच्या खिर्डी, गुजरवाडी, पुनतगाव, गोणेगाव, इमामपूर या जवळच्या खेडेगावातील सहाशेच्या आसपास मुले-मुली शिक्षण घेतात. माध्यमिक विद्यालयाला शिक्षकांची १९ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील शिक्षकांची तब्बल ८ पदे रिक्त आहेत. त्यात गणित, शास्त्र, शारीरिक शिक्षण आणि हिंदी विषय शिक्षकांची पदे रिक्त
आहेत.
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे उपलब्ध असणाऱ्या शिक्षकांवर अतिरिक्त भार पडतो. ठरलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देता येत नाही. पाठ शिकवताना त्यांची दमछाक होते. त्यामुळे कमी वेळेत जास्त अभ्यासक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांना समजत नाही. त्यातून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत होते. सरपंच वामन तुवर यांनी सावित्रीबाई फुले पुणे

विद्यापीठातून औषध निर्माणशास्राची पदवी संपादन करून एमबीए पूर्ण केले आहे. सध्या ते आठवी ते दहावीच्या वर्गाना शास्त्र व गणित हे विषय शिकवतात. सरपंच तुवर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणही पाचेगावात झाले. वाचनासह पर्यटन, राजकीय व सामाजिक क्षेत्रात ते काम करतात. शिकवण्याच्या आवडीतून त्यांनी हे काम हाती घेतले. शिवाय गावातील सामाजिक कामातही त्यांचा सहभाग असतो.
६६ सेमी इंग्लिश माध्यमाच्या मुलांमध्ये इंग्रजी विषयाचे आकलन कमी आहे. त्यामुळे विषय लवकर समजत नाही. शिकवण्याची मला आवड असल्याने मी वेळ काढून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. उच्चशिक्षित तरुणांनीही पुढे येत आपल्या ज्ञानाचा उपयोग
विद्यार्थ्यांसाठी करावा.
– वामन तुवर, सरपंच, पाचेगाव, ता. नेवासा
१९ पैकी
पाचेगाव विद्यालयात आठ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरपंच तुवर यांनी शिकवण्यास सुरुवात केली.
