Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

AHILYANAGAR NEWS : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे राज्यात बोगस कंपन्यांवर कारवाई करा; पहा सविस्तर

AHILYANAGAR NEWS : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे राज्यात बोगस कंपन्यांवर कारवाई करा, श्रीगोंद्यातील गुंतवणूकदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणी करत आहेत. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

AHILYANAGAR NEWS :

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे राज्यात बोगस कंपन्यांवर कारवाई करा, श्रीगोंद्यातील गुंतवणूकदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणी करत आहेत. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील राजेंद्र आबा म्हस्के, अँड. एस. आर. साके, अंबादास दरेकर, माऊली मोटे, महादेव म्हस्के, मोहन पवार, मुकुंद सोनटक्के, नितीन बोराडे, विनय दरेकर, प्रवीण धुमाळ, अनिकेत धुमाळ यांच्यासह फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले

AHILYANAGAR NEWS
AHILYANAGAR NEWS

राज्यभरात तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात सिस्पे इन्फिनिटी, बीकॉम अशा विविध नावांनी बोगस कंपन्या स्थापन करून गोरगरिब गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपन्यांनी जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केली असून, त्या रकमेचा वापर संचालक व एजंटांनी एशो आराम जीवनासाठी केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीची व्याप्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राज्याबाहेरही असल्याचे दिसून आले असून, या कंपन्यांनी हवालामार्फत फसवणुकीतील रक्कम परदेशात पाठवली आहे. गुंतवणूकदारांची व शासनाची दिशाभूल करून डॉलरमध्ये रुपांतरित केलेली ही रक्कम परत मिळण्यासाठी आणि संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण

AHILYANAGAR NEWS
AHILYANAGAR NEWS

विभागाकडे प्रकरण वर्ग करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदार या फसवणुकीचे बळी ठरले असून, त्यांच्या गुंतवणुकीसह व्याज परत मिळावे, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

या प्रकरणातील कंपन्यांचे संचालक, व्यवस्थापन करणारे अधिकारी, एजंट यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी. तसेच या प्रकरणात आरोपींना पाठबळ देणाऱ्यांनाही सहआरोपी करून कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a comment