farmer success story : शेतकऱ्याने केला भात लागवीडीचा उत्कृष्ट प्रयोग; पहा सविस्तर
farmer success story : शेतकऱ्याने केला भात लागवीडीचा उत्कृष्ट प्रयोग. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली कमाल उपळणाऱ्या जमिनीत भात लागवडीचा यशस्वी प्रयोग मागील चार, पाच वर्षापासून सातत्याने करत आहे लागवड. विहरीच्या पाण्याच्या प्रयोग.
farmer success story :
शेतकऱ्याने केला भात लागवीडीचा उत्कृष्ट प्रयोग. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली कमाल उपळणाऱ्या जमिनीत भात लागवडीचा यशस्वी प्रयोग मागील चार, पाच वर्षापासून सातत्याने करत आहे लागवड. विहरीच्या पाण्याच्या प्रयोग.
परिचित नसलेल्या अकोले तालुक्यातील धामणगाव रोड परिसरातील धुमाळवाडी भागात शेतकऱ्यांनी उपळणाऱ्या जमिनीत भात लागवडीचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतकऱ्यांकडून हा प्रयोग सातत्याने केला जात आहे.

या परिसरात पावसाळ्यात अती पावसामुळे जमिनी उपळतात व त्यामध्ये पाणी साठून राहते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे इतर खरीप पिके घेणे अशक्य असते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी या साचलेल्या पाण्यात भात लागवडीचा मार्ग शोधला आहे. यंदाही शेतकऱ्यांनी भात लागवड केली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे स्वतः तयार केलेली भात रोपे खराब झाली. परिणामी,आता याही जमिनीत होते लागवड
सामान्यतः भात लागवड ही पाण्याने समृद्ध अशा खाचर जमिनींमध्ये होते. मात्र काहीवेळा भात क्षेत्र नसलेल्या ठिकाणी म्हणजे उंचसखल, उपळ्याने तयार झालेल्या किंवा खरिपासाठी योग्य नसलेल्या जमिनींमध्येही शेतकऱ्यांना माताची लागवड करावी लागते.

दुसरीकडून रोपे आयात करावी लागली. त्यामुळे लागवडीस सुमारे पंधरा दिवस उशीर झाल्याचे सांगण्यात येते. पावसाळ्यादरम्यान या जमिनीत पाणी टिकते; परंतु हिवाळा जवळ आल्यावर पाण्याचा तुटवडा जाणवू लागतो. अशा वेळी विहिरीचे पाणी शेतीसाठी वापरले जाते.
धामणगाव रोड परिसरातील धुमाळवाडी भागात उपळलेल्या शेतजमिनीत सुरू असलेली भात लागवड.
पावसाळ्यात आमच्या काही जमिनीत पाणी साठून राहते. अशा स्थितीत इतर पिके घेता येत नाहीत म्हणून आम्ही भात लागवडीचा प्रयोग केला. सुरुवातीला काही अडचणी होत्या; पण आता हा प्रयोग यशस्वी ठरतोय. यंदा पावसामुळे रोपे खराब झाली, त्यामुळे थोडा उशीर झाला.
शरद शेटे,
शेतकरी, धुमाळवाडी
