Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

kharip perni : नाशिक मध्ये झाली तब्बल खरिपाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी; आता पाहताय पावसाची वाट.

kharip perni : नाशिक मध्ये झाली तब्बल खरिपाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी; आता पाहताय पावसाची वाट. नाशिक जूनच्या शेवटी आणि जुलै च्या सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर उघडीप दिली पावसाची उघडीप पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. तसेच जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र वाढले; सोयाबीन लागवडीत घट.

kharip perni :

नाशिक मध्ये झाली तब्बल खरिपाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी; आता पाहताय पावसाची वाट. नाशिक जूनच्या शेवटी आणि जुलै च्या सुरवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर उघडीप दिली पावसाची उघडीप पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. तसेच जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र वाढले; सोयाबीन लागवडीत घट.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ८१.०५ टक्के क्षेत्रावर kharip perni झाली असून त्यात मक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मक्याची १२६. ९४ टक्के, कापूस ७३.९१ टक्के सोयाबीन ६७.९४ टक्के तर बाजरीची ५३.४३ टक्के पेरणी झाली आहे. गत गरज भासत आठ दिवसांपासून पावसाने उघडीप असल्याने शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहे.

kharip perni
kharip perni

जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेला पाऊस जूनपर्यंत सुरू राहिला. जूनमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पेरणीला गती आली. कृषी लुताकानिहाय पेरणी (ढक्के) विभागानेही शेतकऱ्यांना मुदतपूर्व पेरणी न करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ७ जूननंतर पेरणी सुरू झाली. यंदा खरीप हंगामाची एकूण ६ लाख ५४ हजार ८७० हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे.

त्यापैकी आतापर्यंत ५ लाख २५ हजार ६२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये मालेगाव, नांदगाव येवला, चांदवड तालुक्यात शंभर टक्के पेरण्या झाल्या आहेत. तर नाशिक तालुक्यात २१.१५ टक्के, सुरगाणा २९.४ टक्के, दिंडोरी ३१ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

पीकनिहाय पेरणी

ज्वारी ४०.४ टक्के, सोयाबीन ६७.९४ टक्के, भात ५०.६९ टक्के, बाजरी ५३.४३ टक्के, मका १२६. ४१ टक्के, एकूण तृणधान्य ८९.५ टक्के, एकूण कडधान्य ५६.१७ टक्के, भुईमूगाची ४९.७३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीत मका पिक आघाडीवर असून त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीन व बाजरी या पिकांचा समावेश होतो. जुलैअखेर एकूण पेरणीचे क्षेत्र १०० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Leave a comment