STUDENT ASSAULT CASE: दहावीच्या अल्पवयीन मुलीवर ३८ वर्षीय स्कुलबस ड्रायव्हरकडून अत्याचार…अखेर उघडलं काय?
"शाळेच्या बसचा ड्रॉयव्हरच ठरला घातक. 38 वर्षीय चालकाकडून दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; पोलिसांकडून गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू."
STUDENT ASSAULT CASE: जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस ड्रायव्हरनेच अत्याचार केल्याचे उघड झालं असून, सुरक्षिततेच्या नावाखाली पालकांनी ठेवलेला विश्वास चक्काचूर झाला आहे. मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी पालक ज्या ड्रायव्हरवर विसंबून असतात, तोच नराधम ठरल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे.
आरोपीचं नाव अबिद हुसेन शेख जलील (वय 38, रा. शेंदुर्णी) असं असून, तो विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करीत होता. “मला तू आवडतेस” असे घाणेरडे संवाद तो विद्यार्थिनीला सांगत असे. एवढंच नव्हे, तर फोनवरून अश्लील शिवीगाळ करून मुलीला मानसिक छळ (STUDENT ASSAULT CASE) देत असल्याचं तपासात समोर आलं आहे. शेवटी या नराधमाने विश्वासघाताची परिसीमा गाठत, शाळेच्या बसमध्येच बलात्कार केला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल (STUDENT ASSAULT CASE) करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली असून, पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.
विश्वासघात आणि सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेनं पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळकरी मुलींवर सतत घडणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर, या घटनेने प्रशासन आणि समाज दोघांनाही हादरवून सोडलं आहे. आता या प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
काय आहे प्रकरण?

जळगाव जिल्ह्यात घडलेली ही घटना प्रत्येक पालकाच्या मनाला हादरवून टाकणारी आहे. ज्यांच्यावर मुलांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी पालक विश्वासाने सोपवतात, तोच स्कूल बस ड्रायव्हर विश्वासघातकी ठरला. 38 वर्षीय अबिद हुसेन शेख जलील (रा. शेंदुर्णी) या नराधमाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाचोरा न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी पीडित मुलीने दिलेल्या पुरवणी जबाबात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बस चालकाने तिला माळेगाव (ता. जामनेर) येथील शेतात नेऊन बलात्कार केला, तसेच वारंवार फोनवर धमक्या देऊन अश्लील भाषेत छळ करत होता, असं मुलीने स्पष्ट केलं आहे.
दररोज या बसमधून ५० ते ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करतात. त्यामुळे या आरोपीने इतर विद्यार्थिनींनाही कधी गैरवर्तनाला सामोरं केलं आहे का, याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून, शालेय व्यवस्थेतील सुरक्षेवरचं गंभीर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा समोर आलं आहे.
तू मला आवडतेस:

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात उघड झालेली ही घटना प्रत्येकाला हादरवणारी आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ने-आण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली जाते, तोच स्कूल बस चालक अबिद हुसेन शेख जलील (वय 38, रा. शेंदुर्णी) मुलींच्या आयुष्याशी खेळ करत असल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, पाचोरा तालुक्यातील काही विद्यार्थी दररोज शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे शिक्षणासाठी स्कूल बसने जातात. याच विद्यार्थ्यांमध्ये पीडित मुलगीही होती.
गेल्या महिन्यात आरोपी अबिद दुचाकीवरून मुलीच्या गावात गेला होता. तेव्हा मुलगी बाहेर पडताच त्याने तिचा पाठलाग केला आणि ‘तू मला आवडतेस’ असं बोलत तिला त्रास दिला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर मुलीचा विनयभंग केला, असा गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मुलींच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर आणेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
